आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान’ हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. यामध्ये प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.हर घर तिरंगा अभियानाच्या प्रचार आणि जनजागृती कार्यक्रमासाठी नुकतेच मंठा येथील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, सभापती संदीप गोरे, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, नागेश घारे, प्रसाद गडदे, गणेश खवणे, माऊली शेजुळ, जिजाबाई जाधव, राजेश मोरे, प्रसाद बोराडे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला महिला बचत गटांच्या विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत ध्वज पुरवठा केला जाणार आहे. यावेळी बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज मंजूर करून धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार लोणीकर यांनी संहितेचे पालन करीत प्रत्येकाने या अभियानात राष्ट्रीय सण समजून उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन करुन प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी थोरात, मुख्यधिकारी रितेश बैरागी, प्रल्हाद दवणे, डॉ. स्वाती पवार, डॉ. प्रताप चाटसे यांच्यासह महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.