आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुस्तक वाचाल तरच आजची पिढी वाचेल‎ ; प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने यांचे प्रतिपादन

अंबड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रंथ हे आपले गुरु आहेत तर पुस्तके‎ हे आपले मित्र आहेत. पोटाच्या‎ भुकेसाठी अन्न लागते तर‎ मस्तकाच्या भुकेसाठी पुस्तके‎ लागतात आजच्या पिढीची वाचन‎ संस्कृत धोक्यात आलेली असून‎ आजच्या पिढीने पुस्तकांची मैत्री‎ करावी पुस्तके वाचावेत तरच या‎ पिढीचे भवितव्य आहे पुस्तक‎ वाचाल तर आजची आजची पिढी‎ वाचेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ.‎ पुरुषोत्तम जुन्ने यांनी केले.‎ अंबड शहरातील सरस्वती प्राथमिक‎ विद्यालयाच्या विद्यार्थ्यामध्ये वाचन‎ कौशल्य वाढवण्यासाठी सांगली‎ जिल्हयातील कवठेमहाकाळ येथील‎ विदेशात नोकरीस असलेल्या युवा‎ इंजिनिअर सुशांत भारत सुपने‎ तब्बल ४० हजार रुपयांची महान‎ थोर पुरूषांचे चारित्र्य, काव्य,वेद,‎ कादंबरी, गोष्टी आदी एकूण १८०‎ पुस्तके भेट म्हणून दिली. ती पुस्तके‎ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून‎ देण्यासाठी विद्यालयात आयोजित‎ पुस्तक सोहळ्यात ते बोलत होते.‎ यावेळी मुख्याध्यापिका पूनम मेहर,‎ पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे,‎ आदित्य पवार यांची उपस्थिती होती.‎ यावेळी संतोष जिगे यांनी आपण‎ पुस्तकांसोबत मैत्री करावी ते‎ आपल्याला जीवन जगण्याचा‎ मूलमंत्र देत आपल्याला जीवनात‎ नेहमी मार्गदर्शन करत असतात.‎ तुम्ही वाचायला शिकला तर‎ निश्चितच बोलायलाही शिकाल‎ असे सांगून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे‎ नियमित वाचन करण्याचे आवाहन ‎केले.

आदित्य पवार यांनी‎ विद्यार्थ्यांनी टीव्ही, मोबाईल न‎ पाहता विविध महापुरुषांची पुस्तके ‎तसेच प्रेरणादायी गोष्टीची पुस्तके ‎वाचावी. महापुरुष समजून घ्यायचे असेल तर त्यांचा इतिहास तुम्हाला ‎वाचावा लागेल.त्यातून तुम्हाला ‎ जीवनात संघर्षावर मात करण्याची ‎प्रेरणा मिळेल असे सांगितले. ‎त्याचप्रमाणे विद्यालयास भेट ‎मिळालेल्या पुस्तकांना पाहून ‎विद्यार्थ्यांचे मन खूपच आंनदीत‎ झाले असून या पुस्तकांचा‎ विद्यार्थ्याच्या भविष्यावर निश्चितच ‎ ‎ चांगला प्रभाव पडेल असा विश्वास ‎ ‎ व्यक्त केला. प्रास्ताविक शिक्षिका किरण बुर्ले यांनी केले. या‎ कार्यक्रमास स्मिता तौर, अनिता‎ बीडकर, पल्लवी चव्हाण, किरण‎ बुर्ले, क्रांती झाडे, स्वप्ना डोईफोडे,‎निलेश हामणे, प्रमोद शेवाळे आदी‎ विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...