आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टोपे महाविद्यालय क्रिकेट संघ विभागीय स्पर्धेस पात्र

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जालन्यातील अंकुशराव टोपे महाविद्यालयाचा संघाने विजेतेपद पटकावून विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल कार्यालय जालना च्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धे मध्ये एकूण ८ संघांनी सहभाग घेतला.

अंतिम सामना निर्मल क्रीडा महाविद्यालय, बदनापूर व अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना यांच्या मध्ये झाला. यामध्ये अंकुशराव टोपे महाविद्यालयाचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. या संघात कर्णधार शेख अरवाज, रितेश चव्हाण, प्रविण रिंधे, पालवे ऋषिराज, लोकेश भगत, रोहन इंगळे, अन्सारी जिशन, आशिष सावळे, चव्हाण सचिन, साशा सचिन, रोहित कोकडे, विटेकर तुषार, महेश किल्लेदार होते. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय शेळके, प्रा. डॉ. भुजंग डावकर, राजू पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाची विभागीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

या यशाबद्दल मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश टोपे, संस्थेच्या सचिव मनिषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. मिलिंद पंडीत, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, उपप्राचार्य रमेश भुतेकर, प्रा. डॉ. अशोक हुसे, प्रा. डॉ. करवंदे, कार्यालयीन अधीक्षक रामदल घुसिंगे, खोपन शिंदे यांच्यासह आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...