आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठिंबक विक्री करणाऱ्या कंपनीकडून शेतकरी व वितरक यांना व्यवसाय व उत्पादन वाढीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली. एव्हढ्यावरच न राहता रक्कम वसूलीचा तगादा लावला असून यामुळे मानसिक छळ होत असून संबधीतांविरोधात कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह पालकमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे. व्यवसाय वाढीच्या दृष्टीकोनातून संबधीत कंपनीकडून वेळोवेळी विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात ठिंबकचे साहित्य देण्यात आले आहे. त्याच ताकदीने त्यांनी कायदेशीर व्यवहार करुन, शासकीय अनुदानाची प्रक्रिया पार पाडून तसेच वेळोवेळी आपल्याकडून व शासनाकडून येणाऱ्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन आम्ही शेतकऱ्यांकडून उधारी जमा करुन कंपनीस नियमितपणे अदा केलेली आहे. कालांतराने शासकीय नियमावलीमध्ये बदल झाल्याने संबधित कंपनीच्या नियमांत बदल झाले. यानुसार शेतकऱ्यांना अनुदान रक्कम वजा करुन ठिबक साहित्य विक्री करायचो आणि अनुदान सरळ सरळ आपल्या खात्यामध्ये जमा होत असायचे.
परंतु शासकीय बदलांमुळे ते अनुदान जमा होण्याची पध्दत बदलली. यासाठी पर्याय म्हणून आपल्याकडून शेतकऱ्यांची बँकत खाती उघडण्यात आली. अन त्या खात्यांमध्ये अनुदान जमा करुन घेण्यास ठिंबक कंपनीकडून सुरूवात झाली. दरम्यान, दरवर्षी वितरक नोंदणी नुतणीकरणाच्या वेळी विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे कागदपत्रे भरून घेण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींच्या विश्वासावर वितरकांनीही सर्व कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, ठिंबक कंपनीकडून शासकीय अनुदानाच्या क्लिष्ट पध्दतीमुळे कंपनीकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात सुरूवात झाली. सुरुवात केली आणि यातून आपण आपला व्यवसाय वाढविला. अशा प्रकारे सर्व सुरळीत चालू होते. परंतु, कालांतराने आपण शेतकऱ्यांना वाटप केलेल्या आपल्या कर्जाची रक्कम परतफेड होण्यास विलंब झाल्याने अडचणीत वाढ झाली. यातील कर्ज रक्कम विक्रेत्यांच्या नावावर खपवल्याचा आरेाप विक्रेत्यांनी केला आहे.
या प्रकरणातून पालकमंत्री राजेश टोपे तसेच कृषिमंत्री दादा भुसे यांनी तोडगा काढण्याची मागणी हरीत क्रांती ड्रीप डिलर असोशिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, नेटाफीम ऍग्रीकल्चरल फायनासिंग एजन्सी (एनएएफए) या नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) तसेच (एनआयआयपीएल) यांच्याकडून विक्रेत्यांकडे वसूलीचा तगाता लावला जात असल्याचेही विक्रेत्यांनी कृषि मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी नेटाफेम कंपनीच्या अधिकाऱ्यांबरेाबर दिव्य मराठी प्रतिनिधीने बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरीष्ठांना विचारल्याशिवाय बोलणार नसल्याचे सांगीतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.