आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषणेच्या विरोधात सकल जैन समाजाचा बंद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनादिकाळापासून चालत आलेला जैन धर्म हा पुरातन असून स्वतंत्र धर्मसंहिता आहे. या धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकर ज्या सिद्धक्षेत्रावरून मोक्षास प्राप्त झाले ते झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी सिद्धक्षेत्र अत्यंत पवित्र स्थान आहे. या ठिकाणी लाखो भाविक दर्शनास येतात. अशा पवित्र तीर्थस्थळास केंद्र व राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय या तीर्थस्थळाचे पावित्र्य भंग करणारा असल्याने या निर्णयाच्या विरोधात सकल जैन समाजाच्या व्यवसायिकांनी बुधवारी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून नाराजी व्यक्त केली.

नवीन मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅलीद्वारे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या रॅलीत संगीता लव्हाडे, सोनल लव्हाडे, विजया बोरा, नीता बडजाते, रेखा कासलीवाल, वंदना पाटणी, मंजू पाटणी, रेणू पाटणी, दिपाली पाटणी, रोमा पाटणी, वंदना पाटणी, सारिका दागडा, पूजा पहाडे आदी सहभागी झाल्या होत्या.

निवेदनात म्हटले, सदरील तीर्थस्थळास पर्यटनाचा दर्जा देऊन या ठिकाणी व्यापारी संकुल उभे केले जाऊ शकणार आहेत. वन्य जीव अभयारण्यमध्ये हे स्थळ दाखल करण्याचे षड्यंत्र असल्याचे जैन समाज मानतो, म्हणून सदरील निर्णय परत घेण्यात यावा, या मागणीसाठी अहिंसक पद्धतीने विरोध केला जात आहे. जैन समाजातील व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून पर्यटन स्थळाचा निर्णय रद्द करून तीर्थस्थळाचा दर्जा बहाल करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संजय लव्हाडे, विरेंद्र रूनवाल, रमेश सावजी, सुजीत सावजी, पदम कासलीवाल, संजय लव्हाडे, अनिल सोनी, सुरेश लुनावत, विकास जैन, राजेन्द्र संचेती, विजय बाफना यांच्यासह आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...