आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकास जरूर करा, तो आवश्यक आहे मात्र विकासाचे मनोरे शेतकऱ्यांच्या थडग्यावर उभारू नका. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जमिनी घेण्याचे काम सुरू आहे मात्र त्यांना योग्य मोबदला सरकारकडून दिला जात नाही. सरकार आले व गेले, सरकार मधली माणसे बदलली मात्र सरकारची व्यवस्था आहे तशीच आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परतूर शहरातील मोंढा भागात आयोजित शेतकरी परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रकाश पोकळे, शिवाजी महाराज भोसले, सुरेश गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेट्टी म्हणाले, पंतप्रधान पीक विमा योजनेतून वर्षाकाठी जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम विमा कंपन्या आणि सरकार मधील काही लोक करत आहेत. जनतेच्या पैशावर शेतकऱ्यांच्या नावाखाली संघटितपणे दरोडा घालण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.