आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सातोना रस्त्यावर ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जण गंभीर

सेलू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरातील सातोना रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीत झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी ७.३० वाजता सेलू ते सातोना रस्त्यावर सेलूपासून काही अंतरावर घडली.

सेलू येथील सुनील अनंतराव राजवाडकर (५५, ब्राह्मण गल्ली, सेलू) व ऋषीकेश अंबादास नरळदकर (२२, समतानगर, सेलू) हे दोघेजण दुचाकीने (एमएच २० एव्ही २३१४) वाकी येथून महादेवाचे दर्शन घेऊन सेलू येथे येताना सेलू येथून हादगाव पावडे येथे भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी ट्रॅक्टर खाली जाऊन सुनील अनंतराव राजवाडकर हे जागीच ठार झाले. ऋषीकेश नरळदकर हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन बालासाहेब काजळे, नरसिंग डोळझापे यांनी इतरांच्या मदतीने मृतदेह व जखमीला उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आणण्यात आले. त्यानंतर जखमी ऋषीकेश नरळदकर यांच्यावर डॉ. चव्हाण यांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी पोलिस जमादार एस. एम. राठोड, साहायक पोलिस उपनिरीक्षक सुधाकर चौरे, कांबळे, गवते यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक पसार झाला. तो पावडे हादगाव येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...