आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांना निवेदन:दाभाडी येथे राष्ट्रीयीकृत बँक सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

दाभाडी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी हे मोठ्या बाजार पेठेचे गाव आहे. गावात एकच बँक असल्याने येथील व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थांना बॅंकेत व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहेत. गावात राष्ट्रीयीकृत बँक सुरू करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे करण्यात आली.

दाभाडी पंचक्रोशीत एकच बँक असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे. परिणामी राष्ट्रीयकृत बँक सुरु करावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जैवाळ, सचिव चंदन गोलेच्छा, मनीषा भंसाळी, विशाल पडोळ, काकड महाराज, रावसाहेब जैवाळ ,दीपक भुजंग, शरद दराडे, हर्षद टेकाळे यांच्यासह आदींनी या निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...