आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक तंत्रज्ञान:व्यवसायात प्रगतीसाठी व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा पिढी ही आपल्या देशाची संपत्ती आहे. या युवा पिढीने नाेकरीकडे न वळता आपल्या स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारून असंख्य लोकांना नोकरी द्यावी व नवीन आधुनिक व्यवसायाकडे वळावे. मागील काळात जी मोठमोठी कंपनी होती ही आधुनिक काळात न वळवल्याने समाप्त झालेली आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, त्यांचा व्यवसाय टिकून राहिलेला आहे. म्हणून व्यवसायात प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज आहे. व्यापाऱ्यांनी भारत ई-मार्ट पोर्टल वर निःशुल्क नोंदणी करावी, असे आवाहन कॉन्फरडेशन ऑफ ऑल ईंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुमित अग्रवाल यांनी केले

व्यापारी महासंघ, जनरल मर्चन्ट, कॅट व भारतीय जैन संघटना जिल्हा जालना च्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्नेह मिलन, जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल शाखाना, आदर्श व्यापारी पुरस्कार प्रदान व भारत ई-मार्ट ऑनलाईन पोर्टलाचा शुभारंभ जैन भवनात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे अध्यक्ष सचिन निवंगुणे तर व्यासपीठावर जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, सतीश पंच, संतोष सोनी, सुखदेव बजाज, आनंदी अय्यर, निता मुथा, मंजू कोटेचा, भारती मुथा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात हस्तीमल बंब म्हणाले, जिल्ह्यात व्यापाऱ्यांना संघटीत करून प्रत्येक तालुक्यात गावा-गावात ५० शाखा उघडणारा प्रत्येक व्यापाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रमाणपत्र, ओेळखपत्र, निःशुल्क विमा (इन्शुरन्स) व गावा-गावात महिला शाखा उघडणारा, महिलांना व्यापारी संघटनेत आरक्षण देणारा संपुर्ण देशात एकमेव जालना जिल्हा आहे. नव्याने जालना जिल्ह्याची जन-गणना करण्यात येत आहे, लवकरच जिल्ह्याच्या मोठे अधिवेशन घेऊन निर्देशिका प्रकाशित करून निःशुल्क वितरण करण्यात येईल. जालना जिल्ह्याची ओळख व्यापारी वर्गामुळेच आहे.

देशाचे जडण-घडणीत व्यापार्‍यांचा मोठा वाटा आहे. नैतिकतेने व्यवसाय करीत असतांना व्यापाऱ्यांवर होणारे अन्याय सहन केले जाणार नाही, असे बंब म्हणाले. राष्ट्रीय स्तरवर भारत ई-मार्ट पोर्टल सुरु झालेला आहे. जालना जिल्ह्यात सुध्दा याचा शुभारंभ करण्यात आला आहे, सर्व व्यापाऱ्यांनी यावर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सतीश पंच यांनी सांगितले. सुत्रसंचालन अ‍ॅड. अभय सेठिया यांनी तर जिल्हाध्यक्ष दिनेश राका यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अंकुश राऊत, संजय भरतिया, प्रविण मोहता, जगन्नाथ थोटे, संतोष मुथ्था, सुभाष बोरा, मकरंद सावजी, दिपक मिश्रीकोटकर, आनंद पंच, नरेन्द्र जोगड यांनी परिश्रम घेतले.

यांना केेला पुरस्कार प्रदान
शहरातील व तालुका अंतर्गत ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्य बद्ल व्यापारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात जालना चे नरहरी गिंदोडिया, गेंदालाल झुंगे, ध्रुवकुमार अग्रवाल, आनंद ऊबाळे, मयुर निमोदिया, धर्मेश महेता, श्रीनिवास इंदाणी, अतुल लढ्ढा, बाळासाहेब शेळके, अजित छाबडा, श्रीकांत चिंचखेडकर, महिला विभागा तर्फे सौ. शैला पोपळघट, अंबड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, घनसावंगी तालुक्यातील म. चिंचोळी येथील भरत मुळक, भोकरदन तालुक्यातील धावडा येथील सय्यद निजामोद्दीन यांना आदर्श व्यापारी पुरस्कार देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...