आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीत बदल:राजूरकडे जाणाऱ्या‎ वाहतुकीत उद्या बदल‎

जालना‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगारिका चतुर्थीनिमित्त श्री गणपती‎ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची‎ गैरसोय तसेच अनुचित प्रकार घडू नये,‎ वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी,‎ वाहतुकीची कोंडी न होता कायदा व‎ सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने‎ ९, १० व ११ जानेवारी रोजी राजूरमार्गे‎ जाणाऱ्या वाहतुकीत बदल करत‎ देऊळगावराजा, जाफराबाद, माहोरा,‎ भोकरदन या मार्गाने वाहतूक‎ वळवण्यात आली आहे.

त्यामुळे‎ वाहनधारकांनी वळवलेल्या मार्गाने‎ आपली वाहने न्यावी, असे आवाहन‎ पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे‎ यांनी केले आहे.‎ भोकरदन चौफुली जालना येथून‎ राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड‎ वाहनधारकांनी आपली वाहने‎ देऊळगावराजा, जाफराबाद, माहोरा‎ भोकरदन या मार्गाने न्यावीत, तर‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ पुतळ्यापासून राजूर, जालनाकडे‎ येणाऱ्या जड वाहनधारकांनी आपली‎ वाहने माहोरा, जाफराबाद‎ देऊळगावराजा या मार्गाने न्यावीत.‎ जड वाहतुकीत ९ जानेवारी रोजी रात्री‎ १० वाजेपासून ते ११ जानेवारी रोजी‎ दुपारी २ वाजेपर्यंत बदल असेल.

बातम्या आणखी आहेत...