आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुक:शालेय जीवनात मिळावे वाहतुकीचे धडे : न्या. अहिर

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे विद्यार्थी हे उद्याचे वाहन चालक असतात. त्यांना उद्या रस्त्यावर येऊन वाहन चालवायचे असते, प्रत्येकांना कोणते ना कोणते वाहन चालवावेच लागते. वाहतुकीचे नियम माहिती नसल्याने अनेक अपघात होत असतात. त्यात अनेकांचे जिव जातात. त्यामुळे विद्यार्थी दशेत असतांनाच त्यांना जर वाहतुक नियमाचे धडे दिले तर भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायधीश आर. आर. अहिर यांनी केले.

जालना शहरातील आझाद मैदान येथे २० ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भागीरथी मोटार ड्रायव्हींग स्कुल आणि जय भारत सेवाभावी संस्थेच्या वतीने वाहतुकीचे नियम, अ‍ॅसिड हल्ला आणि व्यसनमुक्ती या विषयावर जनजागृती शिबीर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक विकास काळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार, अच्युत मोरे, मोहन पवार, धांडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना न्यायधीश आर.आर. अहिर म्हणाले की, कोविड मुळे मृत्यु झालेल्या लोकांचा आकडा आपल्याला रोज कळायचा, त्यामुळे धास्ती वाढली होती. परंतु, रोड अपघातात रोज बळी जातात, त्याकडे सुध्दा आपण गांभीर्याने पहाला हवे. हेच रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमाची जनजागृती महत्वाची असून प्रत्येकानी वाहतुकीचे नियम समजून घ्यावेत असेही यावेळी न्यायधीश आर.आर. अहिर यांनी सांगीतले. यावेळी विकास काळे, प्रवीण पवार, मोहन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...