आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधूलिवंदनात चुकीचा रंग निवडला तर शरीराला इजा होते. यामुळे नैसर्गिक रंगाला प्रत्येक जण महत्त्व देतो. दरम्यान, जालन्यातील कृषी विज्ञान केंद्राकडून २०१५ पासून नैसर्गीक रंग तयार करण्याचे बचत गटातील १७० महिलांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे पळसाची फुले, हळद, बिट रुट, पालक, कडुलिंबाचा पाला यापासून तयार केलेला नैसर्गिक रंग जालन्यातून इतर जिल्ह्यांतही विक्रीसाठी जात आहे. चालू वर्षात २०० किलोपर्यंत रंग परजिल्ह्यात विक्रीसाठी गेल्याची माहिती केव्हीकेकडून देण्यात आली आहे. होळी साजरी करा, पण आरोग्यही सांभाळा असे आवाहनच आरोग्य विभागाकडून केले जाते. परंतु, यासाठी नैसर्गिक रंगाचीही गरज असते.
दरम्यान, जालना शहरातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रांतून रंग तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे अनेक महिला होळीच्या अगोदर दहा-बारा दिवसांपासूनच रंग तयार करण्याचे काम सुरू करतात. दरम्यान, पळसाची फुले, बिट रुट, कडुलिंबाचा पाला यापासून रंग तयार करून तो विक्री केला जात आहे. चालू वर्षात २०० किलोपर्यंत रंगाची विविध बचत गटाच्या महिलांनी विक्री केल्याची माहिती केव्हीकेकडून देण्यात आली. यासाठी केव्हीकेचे यशवंत सोनुने, गृह विज्ञान तज्ज्ञ संगीता कऱ्हाळे आदी परिश्रम घेत आहेत. नैसर्गिक रंगामुळे आरोग्यावर परिणाम नसल्यामुळे लहान मुलांसाठीही याच रंगाचा वापर होतो.
बचत गटातील महिलांना रोजगार
बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला. होलसेल पद्धतीने इतर जिल्ह्यांतही हा रंग पाठवला जातो. लाल, पिवळा, हिरवा, निळा असे रंग तयार करून पाठवण्यात आले आहेत. ५०० ते ६०० रुपयांच्या किलोपर्यंत हा दर जातो.
२०१५ पासून महिलांना प्रशिक्षण
२०१५ पासून महिलांना नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यातून काही बचत गटांनी हा उद्योगही सुरू केला आहे. यातून या बचत गटांच्या काही महिलांना रोजगार मिळाला. - संगीता कऱ्हाळे, गृहविज्ञान तज्ज्ञ, केव्हीके, जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.