आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया व आयकेईए यांच्या संयुक्त विद्यमाने व केशवराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या अखत्यारीत जालना जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये “शाश्वत जमीन व पाणी व्यवस्थापन” प्रकल्प सुरू आहे. त्यापैकी १० गावांमध्ये “घरपरत्वे झाड” या संकल्पनेतून प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ एक झाड लावणे. या उद्देशाने गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या घराजवळ लावण्यासाठी जांभूळ, वड, आंबा, पेरू, सीताफळ, नारळ, पिंपळ, चिंच, बदाम, अंजीर, लिंबू इ. अनेक प्रकारची एकूण १७६२ रोपे वाटप करण्यात आले.
२९ नोव्हेंबर रोजी जालना तालुक्यातील मौजपुरी या गावात शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांच्या हस्ते त्यांच्या घराजवळ लावण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषिभूषण उद्धवराव खेडेकर, रूपश्री सीड्सचे संचालक पांडुरंग सहाने, कोरोमंडल फर्टिलायझर्सचे नागरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मौजपुरी गावचे सरपंच भागवत राऊत व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांत वृक्ष लागवड जनजागृतीही करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.