आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षवल्ली आम्हा सोयरे:बँका, पतसंस्थेकडून वृक्षारोपण मोहीम; पतसंस्थेच्या सीएसआरमधून सहकार्याची तयारी

अंबड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या सौंदर्यात भर देण्यासाठी ओपनस्पेस, खुल्या जागा, स्मशानभूमी, सरकारी शाळा, रस्त्याच्या दुतर्फा मोठया प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बँका आणि पतसंस्थेच्या सीएसआर मधून सहकार्य करण्याची तयारी बैठकीत दर्शविण्यात आली.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत शहरातील बँक आणि सर्व पतसंस्थेच्या व्यवस्थापकांची सीएसआर व पिक विमा संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी शहराच्या सौंदर्यात भर देण्यासाठी ओपनस्पेस, खुल्या जागा, स्मशानभूमी, सरकारी शाळा अशा ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणुन बँक आणि पतसंस्थेत उपलब्ध सी.एस.आर. मधुन पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आपले विचार मांडले. आवश्यक तरतूदीनुसार गरजे प्रमाणे सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. मुख्याधिकारी यांच्याकडून शहरातील सर्व भागाचे सर्वेक्षण करुन चांगला आराखडा तयार करून नियोजन करण्यात येईल, असे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितले. यावेळी विविध बँकाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...