आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापनदिनी आंबेवाडी परिसरात वृक्षारोपण

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरती जनसेवा प्रतिष्ठान रोहनवाडी जालना संचालित, डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आंबेवाडी गावाच्या परिसरात श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. आयोजन महाविद्यालयाच्या द्रव्यगुण विभागाकडून करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सुरवातीला आंबेवाडी गावाच्या परिसराची स्वच्छता केली.

वृक्षारोपणासाठी खड्डे खोदून श्रमदान केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनल ठोसर यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांने वृक्षारोपण करून झाडांना पाणी दिले. यावेळी डॉ. मीनल ठोसर यांनी वृक्षारोपण काळाची गरज या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाने किमान १० तरी झाडे लावण्याचे आव्हान केले तसेच संकल्प नव्हे कृती करूया, वसुंधरा वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी भागवत शिंदे, द्रव्यगुण विभागप्रमुख डॉ. अरुण देशमुख, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ. प्रतिमा कदम, डॉ. ज्योती सोसे, महाविद्यालयातील प्राध्यापकवृन्द, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...