आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन साजरा:पर्यावरणदिनी एक दिवस कार्यक्रम न घेता गांभीर्याने वृक्ष लागवड करावी; आमदार संतोष दानवे यांची सूचना

टेंभुर्णी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण दिवसाच्या निमित्त एक दिवस कार्यक्रम घेऊन कृषी विभागाने इतर दिवस त्याकडे दुर्लक्ष करू नये या निमित्ताने तालुक्यातील लागवड झालेल्या गावात आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असून हा कार्यक्रम सामाजिक भान ठेवत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम कृषी विभागाने गांभीर्याने राबवावा, असे आवाहन आमदार संतोष पाटील दानवे यांनी केले.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने टेंभुर्णी येथील ग्राम संसद कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच सुमन म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव शिंदे, दत्तू पंडित, लक्ष्मण शिंदे, मनोज शिंदे, तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड यांची उपस्थिती होती. पोकरा अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जाफराबाद तालुक्यातील ३३ गावांमध्ये वैयक्तिक क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाणार आहे. या गावात शंभर हेक्‍टर क्षेत्रावर जवळपास हेक्टरी १३२०० रोपांची लागवड केली जाणार असून २४० रुपये प्रति झाडास १२० रुपये प्रति झाड अनुदान मिळणार आहे.

दरम्यान कृषी विभागाच्या वतीने तालुका स्तरावर बांबूच्या रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट कायम करण्यात आले असून उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वच कृषी सहाय्यक समूह सहाय्यक व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे या योजनेची कागदोपत्री लागवड न करता प्रत्यक्ष लागवड करून त्याचे संगोपन कसे केले जाईल याकडे लक्ष केंद्रित करावे. त्या अनुषंगाने आपण स्वतः पुढील काळात वेळोवेळी पोकरा अंतर्गत लागवड केलेल्या तेहतीस गावातील बांबू झाडांची पाहणी करणार आहे. वृक्ष लागवडी संदर्भात आपण कोणत्याही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असे आमदार दानवे यांनी स्पष्ट केले. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य शालीकराम मस्के यांनी तालुक्यातील वृक्ष लागवडीचे महत्व विशद करत केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून जीव रेखा नदीसह इतर ईतर नदी नाल्यांचे खोलीकरण झाले आहे. यामुळे नदीच्या दुतर्फा बांबू लागवडीस मोठा वाव असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या भागात बांबू लागवड केल्यास निश्चित बांबुचे बन तयार होण्यास मदत होईल. पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संतोष गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पाचे यांनी केले.

सामूहिक शेततळे
टेंभुर्णी गणेशपुर गावांमध्ये लागवडीसाठी तीनशे 337 सेक्टर क्षेत्र असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. टेंभूर्णीत सद्यस्थितीत पोकरा अंतर्गत फळबागेचे काम सुरू आहे तर पाच जणांचे सामूहिक शेततळेही मंजूर करण्यात आले आहे. जवळपास ३३२ शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले असून जवळपास एक कोटी ७२ लाख ६९ हजार २९४ रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ८१ लाख ९१ हजार ४४५ रुपयाचे २१६ शेतकऱ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...