आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शाळेत लावलेली झाडे तोडली; गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिंधीकाळेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील जिल्हा परिषद केद्रीय प्राथमिक शाळेत लावलेले चार फूटाचे झाडे दिपावलीच्या सुटीत कुणीतही अज्ञाताने तोडून टाकली आहे. ही झाडे जगवण्यासाठी शाळेकडून देखभाल केली जात होती. परंतु हे झाडे तोडल्याने शाळेने तालुका पोलिसठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणीकेली आहे.

सिंधीकाळेगाव येथे शाळेत आठवीपर्यत वर्ग आहे. शाळेत प्रसन्न वाटावे व सावली रहावी म्हणून शाळेत अनेक वृक्षाची लागवड करण्यात आली होती. लावलेली झाली जगवण्यासाठी दररोज या झाडांना पाणी दिले जात होते. झाडे जगवण्यासाठी शाळेय समितीही प्रयत्न करीत होती. परंतु दिपावलीच्या सुट्टया संपल्याने शाळा सुरू करण्यासाठी पुर्व तयारीसाठी शाळेत गेले असता ही झाडे तोडल्याचे लक्षात आले. याबाबत मुख्याध्यापकाने सरपंच, शालेय समिती अध्यक्षांना ही माहिती दिली. मंगळवारी जालना तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...