आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त:भोकरदन शहरातील उपद्रवी वराहांचा केला बंदोबस्त

भोकरदन2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डुकरांचा हैदोस वाढल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने १२ वराहपालन व्यावसायिकांना नगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावून डुकरांचा आठ दिवसांत बंदोबस्त न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर वराहपालन व्यावसायिकांनी नवीन भोकरदन भागातील समता नगर, रफिक काॅलनी, नूतन काॅलनी, पुखराजनगर आदी भागातील २०० डुकरे पकडून मुंबई येथे देवनार कारखान्यात पाठवण्यात आल्याची माहीती दिलीप जाधव यांनी दिली.

शहरात मोकाट वराह फिरत असल्याने शहरातील नागरीकांच्या घरात घुसुन लहान मुलांना चावा घेत होते. भोकरदन परिसरात घाण करीत असुन शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पिकांचे नासाडी करीत होते. शहरातील नागरीकांची तक्रारावरुन वारंवार बोलावून समक्ष भेटुन संबंधित व्यवस्था करण्याची सुचना देवूनही वराहपालन बंदोबस्त करत नव्हते. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने वराहपालन व्यवसायिकांना आठ दिवसाच्या आता सदरील वराह/डूकराची योग्य ती व्यवस्था करावी; नसता तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांनी दिला होता. भोकरदन नगरपालिका हद्दीत स्वच्छता गृहांची कमतरता आहे. त्यामुळे डुकरांची संख्या झपाट्याने वाढते.

नगर पालिका प्रशासनाने वराहपालन व्यावसायिकांना नोटीस देऊन बंदोबस्त सूचना केली होती. वराहपालन व्यावसायिक दिलीप जाधव, सुखाला जाधव, लक्ष्मण कुऱ्हाडे, साहेबराव कुऱ्हाडे, बाळु गायकवाड, संजु गायकवाड, सुनिल गायकवाड, विठ्ठल गायकवाड, अनिल कुऱ्हाडे, सुर्यभान गायकवाड, , दिलीप कुऱ्हाडे,अनिल कुऱ्हाडे यांनी या डुकरांना नुकतेच बंदिस्त करून मुंबई येथे देवनार कारखान्यात पाठविल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...