आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील विरेगाव येथे जालना मंठा महामार्गावर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ट्रकची दुचाकीला जोराची धडक होऊन दुचाकीवर असलेले सेवानिवृत्त मंडळाधिकारी जागीच ठार झाले. शेख फतरू शेख बाबा (७२) असे मृताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला.
जालन्याकडून लोखंडी सळाई घेऊन मंठ्याकडे जाणारा (एमएच ४३ ई २५०६) ह्या ट्रकने शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शेख फतरू शेख बाबा (७२) सेवानिवृत्त मंडळाधिकारी व प्रगतिशील शेतकरी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.
याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विरेगाव प्रथामिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून विरेगाव येथील क्रबस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस सहायक निरीक्षक विलास मोरे करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.