आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह:शहरात सामुदायिक पद्धतीने तुळशी विवाह

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामूहिक विवाह परंपरेला प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरसेविका संध्या संजय देठे यांच्या प्रयत्नातून दरवर्षी तुळशी विवाहाचे सामूहिक विवाह पद्धतीने आयोजन करून तुळशी विवाह सोहळा पार पाडला जातो. या वर्षीही जालना शहरातील मधुबन कॉलनी येथे तुळशीचा विवाह सामुदायिक पद्धतीने झाला.

या सामुदायिक विवाह पद्धतीमुळे अवलंब करून मोठ्या खर्चिक परंपरेला फाटा देत सामूहिक विवाह आयोजनात सर्वांनी विवाह लावावा, असा संदेश या ठिकाणी देण्यात आला. याप्रसंगी संध्या संजय देठे, निर्मला गोरे, सुरेखा तांदळे, चंद्रभागाबाई जाधव, गयाबाई वानखेडे, सविता वानखेडे, किरण गोरे, सुलभा ढवळे, सविता बागल, पुष्पाताई पोहेकर, योगिता खरात, मीना आटोळे, पूजा वानखेडे आदी महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...