आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्तिक द्वादशीपासून गोपाळकृष्ण व तुळशी विवाहाचा प्रारंभ होतो. पाच दिवसांत या सोहळ्याचा ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान पौर्णिमेच्या दिवशी टेंभुर्णी मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाह लावण्यात आले. या निमित्त संयुक्त कुटुंबामध्ये आनंदाने एकत्रित येऊन विवाह सोहळा संपन्न केला. जवळपास टेंभुर्णीत पाच दिवसांमध्ये शंभर ते सव्वाशे विवाह लागले असल्याचे पुरोहितांनी सांगितले.
तुळशी विवाह संदर्भात येथील पुरोहित विठ्ठल महाराज यांनी सांगितले की घरामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचे काम तुळशी विवाहाच्या निमित्ताने होते. तद्वत्तच या विवाह नंतर घरातील लग्न सोहळ्यांना धार्मिक रित्या परवानगी मिळते. याशिवाय तुळशी विवाह हा श्रीकृष्ण सोबत लावण्यात येत असल्याने बाळकृष्ण व तुळशी विवाहाचा सोहळा भविष्यातील घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात अशी आख्यायिका आहे.
या नंतरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाहाचे सोहळे संपन्न होत आहेत. तुळशी विवाहाच्या नंतर ग्रामीण भागात विवाह जुळवण्यासह लग्न सोहळ्याची धामधूम सुरू होते. सद्यस्थितीत व दुपक्ष ऐवजी वर पक्षालाच वधू संशोधन करावे लागत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर नवरदेव बोहल्यावर चढण्यास इच्छुक असले तरी बहुतांश वधूंची पसंती नोकरी करणाऱ्या मुलांनाच असल्याने ग्रामीणमधील अनेक नवरदेवांना नवरीचा शोध घ्यावा लागत आहे.
आनंदाची पर्वणी
आमचे पाच भावंडांचे संयुक्त कुटुंबासह या कुटुंबात मागील पाच वर्षापासून तुळशी विवाहाचा सोहळा मी आनंदाने साजरा करतो यानिमित्ताने घरामध्ये नवचैतन्य निर्माण होते शुभ कार्याला प्रारंभ होणे तुळशी विवाह धाम धूमित केला जातो यातून एक अनामिक ऊर्जा मिळते.
-अशोक राऊत, टेंभुर्णी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.