आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत शिवार:पिंपळगाव रेणुकाई परिसरात तुरीचे पीक बहरले, शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा

पिंपळगाव रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मोसमी पावसासह परतीचा पाऊस देखील समाधानकारक झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपात लागवड केलेले तुर पिकाची उत्तम वाढ झाली असून सध्या या पिकांना कळी व फूलारा आला आहे तर काही ठिकाणी शेंगा देखील लगडल्या आहे. अती पावसामुळे खरिपातील इतर पिकातुन नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना तुरीतुन आपल्याला हमखास उत्पादन हाती लागणार असल्याचे अपेक्षा आहे. सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी औषधी फवारणी करीत आहे.

मागील पाच ते सहा वर्षापासून विविध नैसर्गिक संकटावर मात करीत शेतकऱ्यांना यावर्षी खरिपात मोठ्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु तालुक्यात सुरूवातीपासुनच पावसाचा जोर कायम राहल्याने पिके पिवळी पडून पिकांची वाढ खुंटली. शिवाय वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस देखील धुव्वाधार झाल्याने परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. खरिपातील नगदी पिके हातातुन गेली. त्यातही ऐन सोयाबीन व मका सोंगणीच्या काळात पावसाने हजेरी लावुन शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या. त्यामुळे पर्यायाने अपेक्षित उत्पादन या पिकातुन शेतकऱ्यांना मिळाले नाही. सुरूवातीला कमी-अधिक पावसामुळे तुरीचे पिक हातातुन जाते की काय अशी शंका शेतकऱ्यांना होती. सोयाबीन तसेच कपाशीच्या शेतात शेतकरी तुरीची लागवड करतात. माञ मागील वर्षी तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन तुरीतुन मिळाले नाही. परंतु यंदा तुरीला हवामान अनुकूल असल्याने तुर जोमात आली आहे.

कोरडवाहु जमिनीवरील तुरीला परतीच्या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. सध्या शेत शिवारात तुरीचे पिके बहरलेले दिसत आहे. यावर्षी शेतकऱ्यांची खरिपाची नगदी पिके मुग, उडीद, सोयाबीन ही पिके गेली तरी तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा माञ आता वाढीस लागल्या आहे. तालुक्यात जवळजवळ सहा ते सात हजार हेक्टवर तुर लागवड केला असल्याचा अंदाज आहे. सध्या हे पिक कळी व फुलोरा येणाच्या अवस्थेत आहे तर काही ठिकाणी तुरीला शेंगा देखील लगडल्या आहेत. परंतु ढगाळ वातावरणात काही प्रमाणात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्याने शेतकरी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी औषधी फवारणी करु लागला आहे. दरवर्षी खरिपात होत असलेले नुकसान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करीत आहे.खरिपातील नुकसान भरण्यासाठी शेतकरी रब्बीची कास धरीत आहे.माञ त्यात देखील अपेक्षित यश मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे गणीत बिघडत चालले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे दिवाळे निघाले आहे.

त्यात शासनाने शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान जाहीर केले आहेत.परंतु हे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडलेले नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक चणचणीत आहे. दरम्यान कमी खर्चात अधीक उत्पादन देणारे तुर या पिकात शेतकरी दरवर्षी वाढ करीत आह

अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास फवारणी करावी यंदा परिसरात तुरीचे पीक चांगले बहरले आहे. ज्या तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल त्यावर निंबोळी अर्क पाच टक्के, अझाडिर्ँकटीन ३०० पिपीएम.५० मीली दहा लिटर पाण्यात मिश्रण करुन फवारणी करावी. यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी ही कीड फीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोऐट पाच टक्के एसजी हे किटक नाशक ४ ग्रम प्रती १० लीटर पाण्यात दुसरी फवारणी केल्यास अळी आटोक्यात येईल. नंदकिशोर पायघन, कृषी सहाय्यक

बातम्या आणखी आहेत...