आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता मोकळा:मुख्य बाजारपेठेत बारा अतिक्रमणे हटवली, रस्ता मोकळा

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरातील बारा अतिक्रमणे हटवली आहेत. यामुळे या भागात काही प्रमाणात रस्ता मोकळा झाला आहे. कायम वर्दळ असलेला रस्ता मोकळा झाल्याने नागरिक व व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जालना शहरातील मुख्य बाजारात नेहमीच वाहतूक खोळंबत असल्यामुळे जालना शहरातील महात्मा फुले मार्केटमधील बुधवारी बारा अतिक्रमणे नगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने हटवली. काही दिवसांनंतर हे अतिक्रमण पुन्हा होते. कायमस्वरूपी अतिक्रमणे काढून हा परिसर मोकळा करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. नुकताच दिवाळी सण संपला आहे.

परंतु, खरेदी करण्यासाठी बाजारात नेहमीच गर्दी असते. बाजारात चोऱ्या होऊ नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली होती. दरम्यान, बुधवारी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने मुख्य बाजारपेठेतील बारा अतिक्रमणे हटवली आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. त्यातच खासगी वाहनधारक आपली चारचाकी, तीनचाकी तसेच दुचाकी रस्त्याच्या कडेला, बसस्थानकासमोर किंवा रस्त्यात कुठेही आडवी-तिडवी उभी केल्या जात असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना व आपल्या दुकानांसमोर रोडवर विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंना व रस्त्यावर कुठेही उभे केलेल्या खासगी वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी उभ्या वाहनांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका
नो पार्किंग, बसस्थानक तसेच शहरातील विविध चौक तथा सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. अशा वाहनधारकांकडून दंड आकारला जात आहे. रोडवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पोलिसांनी इतरत्र जागा शोधून बसण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...