आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोटरी क्लब ऑफ जालना रेनबो, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेवस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणविषयक प्रश्नमंजूषा स्पर्धेत जालना जिल्ह्यातील ५० शाळांच्या प्रत्येकी ५०० याप्रमाणे २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अंतिम फेरीत ऑक्सफर्ड स्कूलने प्रथम, सेंट मेरी स्कूलने द्वितीय तर गोल्डन जुबली स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या ऑक्सफर्ड स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ही प्रक्रिया महिनाभरापासून सुरू होती. पाचवी, सहावी आणि सातवी वर्गातील ५० शाळांमधील प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण २५ हजार विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातून सहा शाळांमधील प्रत्येकी तीन ३ याप्रमाणे १८ विद्यार्थ्यांनी अंतिम फेरी गाठली. अटीतटीच्या झालेल्या या फेरीत ऑक्सफर्ड स्कूलच्या स्वराज पळसकर, वैष्णवी शेजुळ व अफिफ हाके यांच्या गटाने प्रथम, सेंट मेरी स्कूलच्या रौनक अंभोरे, ओंकार काळे व अपेक्षा लाडे यांच्या गटाने द्वितीय तर गोल्डन ज्यूबली स्कूलच्या संभव गादिया, पार्थ करवा व संहिता करवा यांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला.
सेवस संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनंदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ऑक्सफर्ड स्कूलचे तीन विद्यार्थी निवडले गेले आहे. याप्रसंगी सेवस संस्थेचे क्विझ मास्टर अनिकेत गुप्ता, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सत्यनारायण बल्ला, जनसंपर्क अधिकारी तुषार बजाज, रोटरी क्लब ऑफ जालना रेनबोचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पळनीटकर, सचिन डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. मधुर करवा, डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. पूर्णिमा रुईखेडकर, डॉ. अलका हयातनगरकर, स्मिता चेचानी, केतन शहा, संजय राठी, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. महेश माली, कल्पेश भक्कड, स्मिता आबड, अनिल चोरडिया, राजकुमार रुणवाल, जयेश पहाडे, विनोद बजाज गोपाल मुंदडा, निखिल वासवानी आदी होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण करणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे, जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची माहिती व्हावी, आपला परिसर, गाव आणि जिल्हा पर्यायाने देशातील वन्यजीवन समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलणे, प्रसन्न, दूषित वायू रहित समृद्ध पर्यावरणास आकर्षक राष्ट्रनिर्मिती करणे, या उद्देशाने सदरील पर्यावरणपूरक प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.