आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजा, भज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी करिता जालना जिल्ह्यातील महाविद्यालयांचे २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत तालुकानिहाय महाविद्यालयांचे कॅम्प घेण्यात आले. मात्र ८ मार्च २०२३ पर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे फक्त ८ हजार ८२ अर्ज नोंदणी झाले असून गतवर्षापेक्षा २ हजार ५३६ अर्ज कमी आहे. त्यामुळे येत्या १५ मार्चपर्यंत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज मंजूर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ अर्ज नोंदणी व अर्ज मंजुर करणे, शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल न करणे, महाविद्यालयांत समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचना दिलेल्या आहेत. मात्र, नोंदणी केलेल्या अर्जापैकी १ हजार ४२१ अर्ज महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही प्रलंबित असून महाविद्यालयांकडे सातत्याने पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही होत नाही.
जिल्ह्यातील महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्यासाठी समान संधी केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या समन्वयक यांची मदत घेऊन अर्ज नोंदणी वाढण्याची दक्षता घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ अर्ज भरावा. अर्ज नोंदणीकरिता शासन स्तरावरुन मुदत वाढविली नसल्यास अर्ज सादर करता येणार नाही, त्यास सर्वस्वी विद्यार्थी व महाविद्यालय जबाबदार असतील याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही घवले यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.