आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात बुडून मृत्यू:पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. जालना तालुक्यातील बेथलम शिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जुनेद फिरोज बागवान (१४, रा. खडकपुरा, जालना), नमीतखान बाबूखान (१७, रा. बैदपुरा, सदर बाजार, जालना) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

जालना शहरातील जुनेद बागवान व नमीत खान हे दोघे इतर काही मुलांसोबत रेवगाव रोडवरील बेथेल शिवारातील तलावाकडे पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या मुलांनी याबाबत स्थानिक नागरिकांसह नातेवाइकांना माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाइकांनी तालुका पोलिसांना कळवत घटनास्थळी धाव घेतली. तालुका ठाण्याचे उपनिरीक्षक हरीश राठोड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तलावात मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र, पाऊस सुरू असल्याने शोधकामात अडथळा येत होता. पोलिसांनी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकालाही याबाबत माहिती कळवली. मृतदेहाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, असे उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...