आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेंटबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा फेंटबाल असोसिएशन यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय सबज्युनीयर, ज्युनीयर फेंटबाल स्पर्धा जालन्यात होणार आहे. ग्लोबल गुरूकुल, अंबड-मंठा बायपास रिंगरोड येथे ३ व ४ डिसेंबरदरम्यान होणार आहेत.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन १५ ते १८ जिल्ह्याचे ३५० खेळाडु व पदाधिकारी उपस्थित राहणार असून स्पर्धेतुनच पहिल्या राष्ट्रीय सब ज्युनीयर व ज्युनीयर फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रत्येक गटात ६ मुले व ६ मुली यांची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे संस्थापक व सचिव शेख चाँद पी.जे. यांच्या सोबत आयोजन समीतीचे जयंत भोसले, बबन दादा सोरटी, बाला परदेसी, ज्ञानेश्वर ढोबळे, अक्षय भैय्या पवार, अॅड. अमजद पठाण, विशाल साळवे, सुरेश त्रीभुवन, शेख अहेमद, प्रा. गायत्री सोरटी, अमर लोंढे, कार्तीकसर, उमेश खंदारकर, गोवर्धन वाहुळ, मंगेश सोरटी, सुभाष पारे, विजय गाढेकर, तुषार गर्जे, विजय सदावर्ते, संतोष वाघ, किरण पाटील, अशोक शिंदे, नितीन जाधव, वेदांत सोरटी, गणेश गायके, अविनाश पवार, समाधान डोंगरे आदी नियाेजन पाहत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.