आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:जालन्यात होणार दोनदिवसीय राज्यस्तरीय इंडियाका क्रीडा स्पर्धा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा इंडियाका असोसिएशन यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय सबज्युनियर, ज्युनियर, सिनियर इंडियाका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल गुरूकुल, अंबड-मंठा बायपास रिंग रोड जालना येथे ३ व ४ डिसेंबर दरम्यान सदर स्पर्धा संपन्न होईल.

स्पर्धेत महाराष्ट्रातुन १५ ते १८ जिल्ह्याचे ३०० खेळाडु व पदाधीकारी उपस्थित राहणार असुन सदर स्पर्धेतुनच नांदेड येथे संपन्न होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय सब ज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर इंडियाका अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रत्येक गटात १० मुले व १० मुली यांची निवड करण्यात येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य स्पर्धेचे संचालक शेख चाँद पी.जे. यांच्या सोबत आयोजन समीतीचे जयंत भोसले, बबन दादा सोरटी, बाला परदेसी, ज्ञानेश्‍वर ढोबळे, अक्षय भैय्या पवार, अ‍ॅड. अमजद पठाण, विशाल साळवे, सुरेश त्रीभुवन परिश्रम घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...