आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून वाद:जालन्यातील चांदइ एकको गावात दोन गट भिडले; गोळीबारातून एकजण जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवेशव्दार कमाणीचे नाव ठेवण्याच्या वादातून भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे दोन गटात झालेल्या वादानंतर पोलीसांना गोळीबार करावा लागला. यात एक जण गोळी लागून जखमी झाला आहे. विश्वंभर तळेकर (जखमी) असे जखमीचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को या गावच्या प्रवेशव्दारावरील वेशीच्या नाव देण्याच्या कारणावरुन महिनाभरापासून गावात वाद सुरु होता. दरम्यान, वेशीच्या बाजूला एका महापुरुषाचा पुतळा असल्यामुळे वाद वाढला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी हा वाद वाढल्यानंतर पोलीस गावात गेले होते. या ठिकाणी महापुरुषाचा पुतळा व वेस बाजूला काढण्यावरुन गावातील दोन गट एकमेकांसमोर येऊन वाद घालत होते.

याप्रसंगी मोठ्या प्रमाणात जमाव होऊन दगडफेक होऊ लागल्यामुळे पोलीसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. गावात पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह विविध जिल्ह्यातील पोलीस घटनापस्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलीसांनी संपूर्ण गावालाच वेढा मारुन दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...