आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृह:मॉडेल कॉलेज मध्ये दोन‎ नवी वसतिगृहे उभाणार‎

औरंगाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल २ वर्षांनी घनसावंगीच्या मॉडेल‎ कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीची‎ सोमवारी (६ फेब्रुवारी) बैठक झाली.‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले‎ कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. दोन‎ वसतिगृहांचे प्रस्ताव ‘रूसा’ला‎ पाठ‌वणे, ग्रंथालय अद्ययावत करणे,‎ सौरऊर्जा पॅनल बसवणे आणि राष्ट्रीय‎ शैक्षणिक धोरणाप्रमाणे (एनईपी)‎ पदवी स्तरावरील कोर्स तयार‎ करण्यासाठी समित्या करण्याचा निर्णय‎ घेण्यात आला आहे.‎

समितीची मार्च-२०२१ दरम्यान‎ ऑनलाईन बैठक झाली होती. त्यानंतर‎ दोन वर्षांनी झालेल्या बैठकीला सदस्य‎ प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट,‎ कुलसचिव डॉ. भगवान साखळे आणि‎ प्राचार्य डॉ. सतीश दांडगे यांच्यासह‎ अन्य सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय‎ उच्च स्तर शिक्षा अभियान (रूसा)‎ अंतर्गत प्रत्येकी २०० विद्यार्थी आणि‎ विद्यार्थिनींसाठी वसतीगृहाचा प्रस्ताव‎ देण्याचा निर्णय झाला. मैदान‎ विकासासाठी आणि ग्रंथालय‎ अत्याधुनिक करण्यासाठी तरतूद‎ करण्याचे कुलगुरूंनी आश्वासन दिले.‎ पदवीचे कोर्सेस चार वर्षांचे‎ करण्यासाठी समित्यांचे गठण केले‎ जाईल. सोलार पॅनल बसवण्याचा‎ प्रस्ताव राज्य सरकारला दिली जाईल.‎ बी.ए., बी.कॉम., आणि बी. एस्सी.च्या‎ विषयांना एनईपी प्रमाणे चार वर्षांचे‎ करण्याचे निर्देश कुलगुरूंनी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...