आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने चोरी:चोऱ्या होऊ नयेत म्हणून सेलू बसस्थानकात दोन पोलिस

सेलू22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरातील बसस्थानकावर प्रवाशांच्या दागिन्यांच्या चोऱ्यांसह इतर अनुचित प्रकारांना आळा बसावा म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दोन पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. बसस्थानकावरील पोलिस चौकीत ३ नोव्हेंबरपासून दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

मागील आठवड्यात चारठाणा येथील मंगल फटके या महिलेचे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी गेल्यानंतर या महिलेने परभणी आगाराच्या दोन्ही बसमधील प्रवाशांना वेठीस धरले होते. शेवटी बसमधील निरपराध प्रवाशांची झडती घेण्यात आली.

यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारानंतर आठवडाभरातच पोलिसांनी येथील पोलिस चौकीत दोन पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. हे दोन्ही पोलिस कर्मचारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत पोलिस चौकीत हजर राहून सेवा बजावणार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिली. या पोलिस चौकीमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक सय्यद अन्वर, पोलिस शिपाई गजानन जायभाय हे सेवा बजावणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी पोलिस चौकीवर दोन पोलिस नियुक्त केल्यानंतर बसस्थानक प्रमुख वसंत बोराडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...