आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस जखमी:अॅसिडचे शिंतोडे अंगावर उडून दोन वाहतूक पोलिस जखमी

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून आलेल्या एका जणाकडून अॅसिडची बॉटल रस्त्यावर पडली. ती उचलण्यासाठी जात असताना अचानक रिक्षा आली. या रिक्षाचे चाक त्या बॉटलवरून गेल्याने बॉटलमधील अॅसिड दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाले. यात दोन महिला पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना जालना शहरातील सुभाष चौकात गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष चौकात कर्तव्यावर उभे असताना दुचाकीवरून एक बॉटल खाली पडली. ती उचलण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी महिला धावल्या. तेव्हा हा प्रकार घडला.

बातम्या आणखी आहेत...