आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:उमेशचंद्र खंदारकर यांना महाराष्ट्र क्रीडारत्न गौरव राज्य पुरस्कार प्रदान

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कला क्रीडा दूत फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “महाराष्ट्र क्रीडा रत्न गौरव पुरस्कार २०२२” नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिनी औरंगाबाद विभागातून जालना जिल्ह्यातील नेर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उमेशचंद्र खंदारकर यांना ऑल इंडिया ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी संतोष वाबळे, महेश खर्डेकर, शेख महंमद यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व विभागाचे एक एक याप्रमाणे निवड करण्यात आली.औरंगाबाद विभागातून जालना जिल्ह्यातील नेर येथील जिल्हा परिषद प्रशालेचे क्रीडा शिक्षक उमेशचंद्र खंदारकर यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवून महाराष्ट्राचे नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...