आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:पुतण्याला वाचवण्यास काकाची तलावात उडी, दोघांचाही मृत्यू; जालन्याजवळील घाणेवाडी तलावातील घटना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुडत असलेल्या पुतण्याला वाचवण्यासाठी काकाने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जालना तालुक्यातील घाणेवाडी तलावात मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. परमेश्वर भानुदास खंडागळे (५०) व रोहित कृष्णा खंडागळे (१८, दोघे, मांडवा) अशी मृतांची नावे आहेत.

तलावाजवळ रोहित हा गुरे चारत होता. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असून वरील बाजूने मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. तलावाच्या काठावर असलेल्या रोहितचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यामुळे सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जवळच शेतात काम करत असलेले परमेश्वर खंडाळे धावत आले. त्यांनी पुतण्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यात असताना घाबरलेल्या रोहितने परमेश्वर यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...