आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत विद्यार्थी शिक्षक व माता पालक गटाची भूमिकेबरोबरच शिक्षक व मुख्याध्यापकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची व निणर्यांक व अभिमानास्पद असल्याचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी सांगितले. निपुण भारत अंतर्गत असर व नास या राष्ट्रस्तरीय विद्यार्थी अध्ययनस्तर संपादणूक पातळीचे जिल्हा विश्लेषण याबाबत नुकतीच केंद्रस्तरीय शिक्षण परिषद प्राथमि शाळा किनगाववाडी येथे झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधेश्याम मुराहाडे होते. रोहिलागड केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये यशस्वी झाल्याने व अध्ययनस्तर गुणवत्ता संपादणुक पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने माता पालक गटातील लीडर माता पालक सर्वश्रेष्ठ ठरल्याने यामध्ये कार्य केलेल्या सर्व शिक्षकांची मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
त्यामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष सर्वांंगिण विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांची महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गंगावणे यांनी सांगितले. कौचलवाडी येथील उपक्रमशील शिक्षक राधेश्याम चव्हाण यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणामधील भाषा विषयच्या प्राप्त पेटीचा दैनंदिन विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक अध्ययन अध्यापनात या शैक्षणिक साहित्य चा वापर कसा करावा याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रामध्ये गजानन जाधव यांनी गणित विषयाच्या बाबतीत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्राप्त १४६ शैक्षणिक साहित्य कशी वापरायचे त्याचे निगा काळजी कशी ठेवायची याची माहिती दिली.
यावेळी सारिका टकले, वर्षा गोरडे, अर्चना आहिरे, सुप्रिया खेडकर, अंजली माळोदे, शंकर शेट्टये, अनुजा साळुंके, प्रदीप बाविस्कर, मीरा गिराम, विठ्ठल गीते यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. रोहिलागड केंद्रातील पहिली तंबाखू मुक्त शाळा केल्याबद्दल जिल्हा परिषद देशगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब पठाडे यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी तर चंद्रकांत गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी शिरसाट, भास्कर तांगडे, प्रदिप जाधव, विजय आग्रे, कृष्णा भवर, वैशाली भिसे, सारिका टाकले आदींनी परिश्रम घेतले. यावेळी केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.