आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब दानवेंची टीका:म्हणाले - मुंबईसाठी फक्त शिवसेनेने आंदोलन केलेले नाही, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य नैराश्यातून

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महाराष्ट्रात रहावी, यासाठी झालेल्या आंदोलनात फक्त शिवसेनेचेच लोक नव्हते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी संपुर्ण राज्य पेटून उठले होते. तसेच, मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट येईल, तेव्हा सर्व पक्ष आपापसातील मतभेद विसरुन एकत्र येतील. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तुटू देणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

काल आपल्या मास्टर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठीच नागरिकांनी मागणी केलेली नसतानाही मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन आणली जात आहे, असा आरोप केला होता. त्यावर रावसाहेब दानवे यांनी आज प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी करण्याचा कोणाचाही हेतू नाही आणि तसे आपण होऊदेखील देणार नाही. मुंबईवर संकट आल्यास आपण सर्व एकत्र येऊ, असे दानवे म्हणाले.

कोण तिनपाट आणि कोण सोईचे?
केंद्र सरकारकडून तिनपाट लोकांना सुरक्षा पुरवली जात आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोण तिनपाट आणि कोण सोईचे, हे राज्य सरकारनेच ठरवावे, ते आपले काम नाही, असे दानवे म्हणाले. तसेच, राज्यात कोणावर हल्ला झाल्यास त्याला सुरक्षा पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, राज्य सरकारमधील लोकच एखाद्यावर हल्ला करेत असेल आणि त्या व्यक्तीला राज्य सरकार सुरक्षा पुरवत नसेल तर त्या व्यक्तीला सुरक्षा पुरवणे ही केंद्राची जबाबदारी असल्याचे दानवे म्हणाले.

भाजपची कोणतीही बी टीम नाही
फायद्यासाठी भाजप उद्या दाऊदलाही मंत्रिमंडळात घेतील. एमआयएम ही भाजपचीच बी टीम असल्याची टीका दानवे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नैराश्यातून हे वक्तव्य केले आहे. राणा दाम्पत्यामागे, एमआयएममागे भाजप असल्याची टीका ते सातत्याने करत असतात. यात कोणतेही तथ्य नाही. भाजपची कोणतीही ए, बी, सी टीम नाही. उलट शिवसेनेनेच असंगाशी संग केली आहे. ज्यांना तुम्ही सेक्युलर म्हणून हिणवत होते, सत्तेसाठी त्यांच्याशीच युती केली. तुम्ही आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली.

2024ला दाखवून देऊ
शिवसेनेने कधीही पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर टीका केली नाही, असे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर दानवे म्हणाले, शिवसेनेने मोदींचा अपमान केला की नाही, हे जनतेला माहित आहे. शिवसेनेने मोदींच्या वडिलांचे नाव घेत टीका केली होती. त्यांचे वडिल आले तरी महाराष्ट्रात मोदी लाट येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. हे जनता विसरलेले नाही, 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकहाती राज्यावर सत्ता मिळवून शिवसेनेला दाखवून देऊ, असे दानवे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...