आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शासनाच्या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांची एकजूट

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैयक्तिक नावाने असलेली रास्त भाव दुकाने बंद करून ती बचत गट, सहकारी संस्था व ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या अन्यायकारक निर्णयाविरोधात स्वस्त धान्य दुकानदारांनी वज्रमूठ आवळली आहे. बुलडाणा येथील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आक्रोश व्यक्त करण्याचा निर्धार केला.

जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पंडित यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी शासकीय विश्राम गृहात संपन्न झाली. या वेळी संघटनेचे सरचिटणीस विजयकुमार पंडित, राज्य कार्यकारिणी सदस्या क्रांतीताई खंबायतकर, शहराध्यक्ष मणित कक्कड, संकेत पाटील यांची उपस्थिती होती. गोविंदराव पंडित यांनी बुलढाणा येथे सोमवारी ऑल इंडिया फेडरेशन च्या वतीने आयोजित मोर्चात राष्ट्रीय स्तरावरील नेते संबोधित करणार असून जिल्ह्यातील दुकानदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली शक्ती दाखवावी असे सांगितले. बैठकीस बाबासाहेब हिवराळे, श्रीरंग जऱ्हाड, विश्वनाथराव ढवळे, नारायण काळे, प्रभाकर डोंगरे, प्रल्हाद गोरे, रामप्रसाद काळे, कडुबा शितोळे, पंडितराव बोर्डे, गोविंद काळे, शिवाजी बोराडे, शिवशंकर डोईफोडे, नामदेव तनपुरे, राजाराम कांबळे, लक्ष्मीबाई दराडे, गोवर्धन धबडकर, संभाजी राजे कळकटे, दिलीप पवार, गणेश गुल्लापेल्ली, शाम वाघमारे, राम शहाणे, मुकेश जैस्वाल, जया अग्रवालजिल्ह्यातील दुकानदार उपस्थित होती.

बातम्या आणखी आहेत...