आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार; मराठा महासंघाने दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या सञात सर्व शिकवणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असल्याने या सञातील परिक्षा सुध्दा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे, ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाची गती मंदावली असून अशा स्थितीत ऑफलाईन पध्दतीने परिक्षा देण्यास ते सक्षम नाहीत. याचा गांभीर्याने विचार करून ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्याबाबत सर्व विद्यापीठांना आदेश द्यावेत.

नसता विद्यार्थी परिक्षेवर बहिष्कार टाकतील तसेच शासनाच्या मनमानी कारभारा विरुद्ध आंदोलन केले जाईल.असा इशारा जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील, आकाश जगताप पाटील, रोहीत देशमुख, पृथ्वीराज भुतेकर, रोहीत जाधव आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...