आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद बातमी:​​​​​​​उद्यापासून पुन्हा अनलॉक; 62 दिवसांनंतरचा अनलॉक, गतवर्षीही 1 जूनला निर्बंध शिथिल

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल ६२ दिवसांनंतर म्हणजे ७ जून (सोमवार) पासून जालना अनलॉक होत आहे. योगायोग असा आहे की, मागील वर्षीही २४ मार्च राेजी लागलेला लॉकडाऊन मागे घेत १ जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवनमान पुर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तर याबाबतची अधिसूचना ४ मार्चच्या मध्यरात्रीनंतर प्रसिद्ध करण्यात आली.

राज्यातील ज्या १८ जिल्ह्यात अनलॉक केले जाणार अाहे, त्यात जालन्याचा समावेश असल्यामुळे ही जिल्हावासियांसाठी सुखद बातमी ठरणार आहे. दरम्यान, रूग्ण संख्या तसेच त्यानुसार तेथील सेवांसाठी लादल्या जाणाऱ्या अटी शर्थी असणार आहे. यासाठी निर्बध लावले जाणार असून त्याचे एकूण पाच स्तर ठरवण्यात आलेले आहे. स्थितीनुसार नागरीकांना परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

कोविड सुसंगत वर्तणूक ठेवून प्रशासनाला सहकार्य करा
दुसरी लाट आेसरत असली तरी कोरोनाचा संसर्ग हे आपल्यासाठी अजूनही अाव्हानच आहे. याला रोखण्यासाठी शासनाने सुयोग्य पद्धतीने निर्बंधासाठी निकष आखले असून तशा पातळ्या ठरवल्या आहेत. यानुसार नागरिकांनी कोरोना काळात आरोग्याचे सर्व नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेवून आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

सतर्क, अन्यथा पुढचे पाऊल धोक्याचे
दैनिक अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १०२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जालना शहरातील मुक्तीधाम या स्मशानभुमीत एप्रिल महिन्यात दररोज १० ते २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. एप्रिलमध्ये तब्बल २८१ जणांना कोरोनाने हिरावून घेतले होते. मागील काही दिवस याठिकाणी एवढी भयंकर परिस्थिती होती की अंत्यविधीसाठी शेडसुद्धा अपुरे पडू लागले होते. यामुळे अनेक मृतदेहांवर जमीनीवरच अंत्यसंस्कार करावे लागले. तसेच लाकडांचीही टंचाई निर्माण झाली होती. लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे उपलब्ध करून दिल्यामुळे लाकडांची टंचाई दूर होण्यास मदत झाली. अाता जिल्हा अनलॉक होत असला तरी पुर्वानुभव लक्षात घेता अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नियमांकडे दुर्लक्ष झाले तर

अत्यावश्यकसह इतर वस्तूंची दुकाने

  • विविध प्रकारची धार्मिक स्थळे हे स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार राहणा
  • खासगी कार्यालये शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची ठेवता येईल उपस्थिती
  • लग्न समारंभात दालनाच्या ५० टक्के क्षमतेइतके, कमाल १०० व्यक्तींची उपस्थिती
  • अत्यावश्यकसह इतर वस्तूंची दुकाने, माॅल, चित्रपटगृहे (एकल), स्क्रीन असलेले मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, उपाहारगृहे.
  • सर्व उत्पादन केंद्रे ५० टक्के कर्मचारी, वाहतूक बबल ५० टक्के क्षमतेत ये-जा सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग, सायकलिंग, खासगी कार्यालये शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती
  • शेती, ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा जमावबंदी किंवा संचारबंदी नाही.कोरोना प्रतिबंधक नियमांचे
  • पालन करून वाहतूक सेवा राहील सुरू
  • गावातील एकल दुकाने सेवा देणारी केंद्रे करता येईल सुरू
  • जिल्ह्यातील जिम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलेनस केंद्र, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांना असेल लोकांची उपस्थिती
बातम्या आणखी आहेत...