आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशी थांबेल लूट ?:विनानंबर दुचाकी; डोक्यावर हेल्मेट, पाच तास बाजारात संचार, पण पोलिस हटकेना!

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात गेल्या काही महिन्यांपासून व्यापाऱ्यांना लुटणे, चोऱ्यांसह घरफोड्यांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे गुन्हे करण्यासाठी विना नंबरच्याच दुचाकींचा जास्त करून वापर होत आहे. वाढत्या लूटमारीमुळे पोलिस प्रशासन किती सतर्क आहे. या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी दुचाकीला विना नंबर, चेहरा दिसणार नाही असे तोंड झाकून, हेल्मेट घालून चोरट्यांप्रमाणे जालना शहरातील मुख्य बाजारपेठेत दुचाकीवरून फेरफटका मारला. पोलिसांजवळच अनेकवेळा थांबून चोरट्यांप्रमाणे दुकाने बंद करून निघणारे व्यापारी यांच्यावर पाळत ठेवली. या अवस्थेत शहरात पाच तास ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी फिरले. परंतु, एकाही ठिकाणी पोलिसांनी ना थांबविले... ना विचारणा केली. जालना शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून व्यापाऱ्यांना लुटणे, पाळत ठेवून दुचाकीस्वारांना अडवून लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाढत्या चोऱ्यांमुळे विना नंबरच्या दुचाकींवर फिरणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु, जालना पोलिस याकडे कानाडोळा करीत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...