आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची तारांबळ:मंठा शहरासह तालुक्यात‎ मेघगर्जनेत बेमोसमी पाऊस‎

मंठा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या‎ बेमोसमी रिमझिम पावसाने काढणीला‎ आलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी व गहू‎ जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले‎ असून आंब्याचा मोहोर देखील गळून पडला‎ असुन उत्पन्नावर देखील परिणाम होण्याची‎ शक्यता आहे. अचानक आलेल्या‎ पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली‎ होती. मंगळवारी दिवसभर तालुक्यात ढगाळ‎ वातावरण होते.‎

हवामान खात्याकडून पावसाचा इशारा‎ देण्यात आला होता. दरम्यान सोमवारी‎ मध्यरात्रीपासून वातावरणात अचानकपणे‎ बदल होऊन मेघगर्जनेसह बेमोसमी रिमझिम‎ पाऊस बरसला. तालुक्यात सोमवारी‎ रात्रीपासून मेघ गर्जनेसह बेमोसमी पावसाने‎ हजेरी लावली. वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा‎ देखील खंडित झाला होता. बेमौसमी‎ पावसामुळे काढणीला आलेला ज्वारी व गहू‎ जमिनीला लोळत आहे. काढणीला आलेली‎ पिके हातात असताना अचानक आलेल्या‎ पावसामुळे पसरले आहे. काढणीला गहू व‎ ज्वारी आडवी झाल्याने गव्हाची आता‎ हार्वेस्टर ऐवजी हाताने काढणी करावी‎ लागणार असल्याने खर्च वाढणार आहे.‎ मध्यरात्रीपासून पावसाबरोबर जोरदार‎ वाऱ्यामुळे झाडे देखील कोलमडून पडली‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...