आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पऱ्हाट्या:केदारखेडा परिसरात अवकाळी पावसामुळे कापसाच्या पऱ्हाट्या

केदारखेडा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील अनेक गावांत दोन किंवा तीन वेचणीमध्ये कापसाच्या पऱ्हाट्या होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात वेचणीसाठी मजूर मिळाले नसल्याने कापूस एकदाच फुटल्याचे दिसत आहे. याशिवाय बहुतेक परिसरात यंदा लाल्याच्या जोरदार आक्रमणामुळे उभ्या कपाशी पिकांच्या पऱ्हाटया झाल्याने शतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

एकरी दहा ते बाराच्या ठिकाणी चार ते पाच क्विंटल कापूस उत्पादन होईल अशी शक्यता आहे. केदारखेडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ८० टक्के क्षेत्रात पांढरे सोने असलेल्या कपाशीची लागवड केली जाते. महागमोलाचे किटकनाशके औषध फवारुन सुध्दा लाल्या व इतर रोग आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी विष्णू जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...