आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनावरण:धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच महेश स्तंभाचे अनावरण; जय महेश भगवानच्या गजराने अंबड शहर दुमदुमले

अंबड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्यावतीने अंबड शहरात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच महेश स्तंभाचे अनावरण करण्यात आले.नवीन मोंढा समोरील जालना-बीड रस्त्यावर महेश स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या अनावरण माहेश्वरी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर पुष्करणी महादेव मंदीरात नवदाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

सायंकाळी स्वामी समर्थ मंदीरापासून रथावर महादेवांची प्रतिमा व ढोल पथकाच्या गजरात विविध ठिकाणी आतिषबाजी करून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गावरुन जाऊन बालाजी मंदीरात समारोप करण्यात आला. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीरात ६१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी महेश वंदना आणि त्यानंतर आरती करण्यात आली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी माहेश्वरी समाजाचे अंबड तालुकाध्यक्ष राजू मुंदडा, सचिव अतुल मालू, निलेश लोहिया, नितीन गिल्डा, कैलास लाहोटी, विवेक गिल्डा, श्यामसुंदर लाहोटी, पवन गिल्डा, किशोर भांगडिया, केदार राठी, अमर लाहोटी, संतोष सोमाणी, पापालाल लाहोटी यांच्यासह समाजबांधव, महिलांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...