आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्वी एक काळ असा होता ज्याच्याकडे सायकल असेल तो श्रीमंत समजला जायचा. तेव्हा आपल्याकडे वाहतुकीचे उत्तम साधन सायकल असायचे. लोक त्यांच्या घरी ऑफिस, मार्केट, शैक्षणिक संस्था किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सायकल वापरायचे. मात्र दिवसेंदिवस सायकलचा वापर फारच कमी होऊ लागला आहे. लोक आता मोटरसायकल, डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने वापरू लागले आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.
आरोग्य आणि वाढते प्रदूषण पाहता प्रत्येकाच्या जीवनात तंदुरुस्त आरोग्यासाठी तरी सायकलचे महत्त्व असावे, असे प्रतिपादन सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी येथे केले.लायन्स क्लब जालना गोल्ड ग्रुपसच्यावतीने जागतिक सायकल दिनानिमित्त गेल्या ७५ वर्षांपासून सायकल विक्रीचा व्यवसाय करणारे अशोक सहानी आणि अनुप सहानी यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी पायघन बोलत होते. माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट यांनी सायकल दिनाचे महत्व विशद करून सायकल चालवण्याचे फायदे स्पष्ट केले.
सायकलमुळे आरोग्य सुधारते त्याच्यबरोबर पर्यावरणाचेही मोठ्या रक्षण होते. सायकल चालवण्याच्या फायद्यांविषयी जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला देवेश सहानी, सतीश बगडिया, रामदेव श्रोत्रिय, अशोक मिश्रा, संतोष करवा, रूक्मिणीकांत दीक्षित, पोलिस कर्मचारी कडुबा सोनुने, बंटी ओहोळ आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.