आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:ढाकेफळ ते बोरगाव रस्ताकामात माती- मिश्रित मुरुमाचा वापर, संबंधितांचे दुर्लक्ष

तीर्थपुरी2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ ते बोरगाव रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असून या कामात जिवंत मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत असून संबधितानी लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

घनसावंगी व परतूर तालुक्यात जाण्यायेण्याच्या दृष्टीने महत्वाचा आणि जवळचा मार्ग असल्याने काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. परंतु कामावर देखरेख करणारे संबंधित अभियंते कामावर हजर राहत नसल्याने सम्बधित कंत्राटदारांकडून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे. एकदा रस्त्याचे काम झाल्यावर पुन्हा कित्तेक वर्षं रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे जे काम सुरू आहे त्याचा दर्जा चांगला असणे गरजेचे असते. संबधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शासनाच्या पर्यायाने जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा गैरवापर करणाऱ्या गुत्तेदार व संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करून गुणनियंत्रका मार्फत कामाच्या दर्जा बाबद तपासणी करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...