आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळणी ते देवठाणा या पाच किलोमीटरचे काम सार्वजनीक बांधकांम विभागाच्चा दुर्लैक्षामुळे निकृष्ट दर्जाचे केले आहे. या बाबत ग्रामस्थांनी तक्रार करुन काम बंद पाडले होते. या कामावर सार्वजिनक बांधकाम विभागाचे उपअभियंता भगवान िशंदे यांनी भेट देऊन कंत्राटदारास योग्य त्या सूचना दिल्या. या कामावरील संबंधीत कंत्राटदाराने काळी माती खोदून सिमेन्टचे बेड करणे गरजेचे असताना खडीवरच सिमेन्ट काँक्रीटचा माती मिश्रीत अंथरण्यात येत असून माती मिश्रीत वाळू व खडीचा वापर करण्यात आला. या रस्ता कामासाठी चार कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे.
परंतु अंदाजपत्र काप्रमाणे काम करण्यात येत नाही. मध्यंतरी सरपंच गौतम शिंदे व इतरांनी या कामाची पाहणी करुन नाराजी व्यक्त केली होती. सदर काम अंदाजपत्र काप्रमाणे करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, दोन दिवसापूर्वी उपअभियंता भगवान शिंदे यांनी सदर कामास भेट देऊन पाहणी केली. प्रोजेक्ट व्यवस्थापकाला माती मिश्रीत वाळू धुवून घेण्याची सूचना केली. दरम्यान, सद्यस्थितीत वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे गरीब गरजूंचे घरकुलाचे काम ठप्प आहे मात्र तळणी देवठाणा रस्त्यासाठी लागणारा शंभर ते दिडशे ब्रास वाळूसाठा नेमका आला कोठून, यामुळे सबंधीत कंत्राटदार हे काम उरकण्याचा सपाटा लावत आहे. देवठाणा तळणी या रोडवरून परीसरातील अनेक गावाच्या प्रवाशांची ये जा मोठ्या प्रमाणात असते.
रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी गिट्टीचे गंज पडले असून ठेकेदाराने वाहतूकी साठी वळण रस्ता काढून देने गरजेचे असतानाही तो काढला नसल्यामुळे एक साईड वाहन चालकाची कसरत होत आहे अनेक दुचाकीस्वाराना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, तळणी देवठाणा रोडच्या कामाचा दर्जा अत्यत खालच्या दर्जाच्या असून बोगस साहित्याचा वापर व संबंधीत अधिकाऱ्यांची ठेकेदारावरील मेहरबानी मुळे त्याना बळ मिळत संबधीत रोडची चौकशी करण्याची जिल्हाधि ऱ्यांकडे करणार असल्याचे सरपंच गौतम सदावर्त यानी सांगितले. सध्या तळणी परीसरात वाळूची टंचाई असताना सबंधीत कंत्राटदाराकडे एवढ्या मोठया प्रमाणात वाळू साठा येतोच कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.