आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासॊयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे सोयाबीनचा वापर दैनंदिन आहारात केला पाहिजे, असे प्रतिपादन केव्हीकेच्या गृहविज्ञानतज्ज्ञ प्रा. एस. एन. कऱ्हाळे यांनी करून बालकातील कुपोषण व त्यावरील उपाय या विषयावर मार्गदर्शन करून कुपोषण निर्मूलनासाठी सोयाबीनचे आहारातील महत्त्व, प्रथिनेयुक्त पदार्थाबद्दल माहिती दिली.
खरपुडी कृषी विज्ञान केंद्राद्वारे गृहविज्ञान विभागमार्फत कुपोषण निर्मूलणासाठी सोयाबीन पासून प्रथिने युक्त पदार्थ व व त्याचे महत्व या विषयावर अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उदघाटन केव्हीकेचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रयोगशिल शेतकरी मोनिका शर्मा, जेईएस महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी, संतोष मुंढे यांची उपस्थिती होती.
यावेळी मोनिका शर्मा यांनी पर्यवेक्षिकाना विविध पदार्थ्यांचे जसे की डाळ, पीठ, सोयाबीन फ्लेव्हर्ड दूध, पनीर, सोयाने, इत्यादी प्रात्यक्षिका द्वारे करून दाखवले. प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी विस्तार कार्यकर्त्याची भूमिका व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करुन अंगणवाडी पर्यवेक्षीकांची भूमिका महिला व बालकांचे आरोग्य चांगले, निरोगी राहावे यासाठी फार महत्वाची आहे व अशा प्रकारचे विविध उपक्रम खरपुडी येथील केव्हीके मार्फत नेहमीच राबविले जातात. प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थिनी केविकेच्या मॉडेल पोषण बागेस भेट देऊन महत्व जणून घेतले. या प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातून पर्यवेक्षिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.