आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:व्ही. एस. एस. महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळचा समारोप, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन

बदनापुर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औद्योगिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा : लघाने

वीस वर्षापूर्वी समितीचा विरोध पत्करून आपण वाणिज्य शाखेत माहिती-तंत्रज्ञान विषय सक्तीचा केला होता. काही वर्षातच त्याचे सदृश्य परिणाम दिसले. आज माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला असून नव उद्योजकांनी सकारात्मक- नकारात्मक बाजू तपासून औद्योगिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. असा सल्ला माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. के. बी. लघाने यांनी दिला.

व्ही. एस. एस. महाविद्यालयात शनिवारी रोजी राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. लघाने बोलत होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास खंदारे, डॉ. राहुल म्हस्के, अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे , सिनेट सदस्य डॉ. भारत खंदारे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. सुहास मोराळे, डॉ.शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. लघाने यांनी पूर्वी संशोधनासाठी येणाऱ्या अडचणी ,कष्ट या विषयी माहिती देत आज माहिती तंत्रज्ञानामुळे सेकंदात माहिती मिळते, औद्योगिक क्रांती, विकसित बाजारपेठेत स्पर्धा वाढली असून नव उद्योजकांनी विचारपूर्वक योग्य पद्धतीने तंत्रज्ञान हाताळावे. असे डॉ. लघाने यांनी नमूद केले.

डॉ. चेतना सोनकांबळे यांनी जागतिकीकरणात शाश्वत राहण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचे टुल्स, कौशल्ये आत्मसात करावी, नवीन पिढीने स्टार्टअप साठी ध्येय घेऊन नोकऱ्या मागण्याऐवजी, नोकऱ्या देण्यासाठी जोखीम पत्करावी. असे सांगून माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगळ्या संकल्पना, विचार जागतिक रेकॉर्ड करू शकतात असे त्यांनी नमूद केले. डॉ. राहुल मस्के यांनी अडचणींवर मात करून संशोधकांनी उद्दिष्टापासून अलिप्त होऊ नये असे सांगितले. डॉ. विलास खंदारे म्हणाले, देशात डिजिटल विद्यापीठे स्थापन झाली असून यूजीसीने ४० टक्के ऑनलाइन चे निर्देश दिले आहेत. डिजिटल युगात प्रचंड वेगाने विकास किंवा मंदी येऊ शकते याचा विचार करावा. असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंचालन डॉ. सतीश कंठाळे यांनी केले तर प्रा. माधुरी गीते यांनी आभार मानले राष्ट्रगीताने कार्यशाळेचा समारोप झाला या वेळी संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी, ऑटोमोबाइल, निर्यात क्षेत्रात स्टार्ट अप च्या संधी :भारतातून आज एकोणचाळीस मिलीयन डॉलर निर्यात होते. २०२५ पर्यंत साठ मिलीयन डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट असून उत्पादकता, कृषी, ऑटोमोबाइल, टेक्स्टाईल ,सेंद्रिय अन्नधान्य, वाहतूक अशा क्षेत्रात स्टार्ट अप साठी नव उद्योजकांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. असे अधिष्ठाता डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी परिसंवादात सांगितले. तर मराठवाड्यात नवीन आर्थिक प्रगती होत असल्याचे डॉ. सत्यकुमार राठी यांनी नमूद केले. कार्यशाळेत उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान , नवउद्योजकता व संशोधन अशा विषयांवर तीन परिसंवादात तज्ञांनी मार्गदर्शन केले .यात डॉ. शंकर तळेकर ,डॉ.भास्कर साठे ,विद्या पटवारी, डॉ.प्रवीण येन्नावार, डॉ.सुनील मिरगणे, डॉ.अरुण खरात ,डॉ मनीषा सुतार यांनी सहभाग नोंदवला. एकूण सात संशोधन प्रबंधाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...