आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदे असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना स्वराज्य संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरिबांची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण रुग्णालय भोकरदनला आता भीतीदायक दृष्टीने बघावे लागत आहे. कारण आज गरीब घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याला उपचार करण्यासाठी आपल्या आर्थिक समस्येच्या नजरेतून जवळ दिसते ते ग्रामीण रुग्णालय भोकरदन. परंतु भोकरदन येथे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे रुग्णालयातील कार्यप्रणालीवर अतिरिक्त भार पडून ऐका कर्मचाऱ्याला एकाच वेळेस चार-चार कर्मचाऱ्यांच काम बघावे लागत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला जीव ही गमवावा लागू शकतो.
त्यामुळे शासन प्रणालीने या अडचणीला डोळ्या समोर ठेऊन त्वरित कठोर पावले उचलून रिक्त पद भरण्याचे आदेशीत करावे; अन्यथा आपल्या शासन व्यवस्थेच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनावरद्वारे विकास जाधव, विशाल लोखंडे, कृष्णा लोखंडे, राजू ढोके, सोमिनाथ ढोके, सुरज मव्हारे, लहू सिरसाठ, आकाश हिवाळे, शकुणाल गायकवाड, नारायन सोन्नी यांच्यासह आदींनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.