आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदे भरावीत:सेवलीच्या उर्दू शाळेतील रिक्त पदे भरावीत

सेवली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत ३ सहशिक्षकांसह इतर २ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या शाळेत १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना केवळ दोनच शिक्षक शिकवत आहेत.

विशेष म्हणजे मागील पाच वर्षापासून पदवीधर शिक्षकाचे पद भरलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एक शिक्षिका आंतरजिल्हा बदलीने शाळेत रुजू झाली होती. मात्र एक महिन्याच्या आत त्यांची बदली करण्यात आली. शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.

बातम्या आणखी आहेत...